केंद्रीयमंत्री ना.नारायण राणे उपस्थित राहणार
कणकवली
पंचायत समिती कणकवलीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा उदघाटन सोहळा बुधवार 17 नोव्हेंबर 2021 रोजी साय.5.00 वाजता केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. पंचायत समिती कणकवलीच्या नूतन इमारतीचे स्वप्न ना.नारायण राणे यांच्या प्रयत्नातून पूर्ण होत आहे.या इमारतीसाठी सन 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनकडुन निधी प्राप्त झाला व सन 2017 मध्ये सदर इमारतीचे भूमिपूजन नारायण राणे झाले व आता हे स्वप्न साकार होत आहे.
पंचायत समिती कणकवली ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ज्यामध्ये पंचायत समीतीचे सर्व विभाग एकाच छताखाली येतील अशी ही पहिलीच इमारत आहे.ग्रामीण भागातील जनतेला एकाच ठिकाणी आपली प्रशासकीय कामे करता यावीत त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत देता यावा तसेच पदाधिकारी यांना अधिकारी, कर्मचारी यांच्याशी थेट व वेळेत संपर्क साधून गोरगरीब जनतेची कामे वेळेत पूर्ण करता यावीत या उद्देशाने या प्रशासकीय इमारतीची रचना करणेत आलेली आहे.पंचायत समिती कणकवलीने आजपर्यँत सर्व क्षेत्रात मोठी भरारी घेतलेली आहे.आणि यातीलच ही नवीन प्रशासकीय इमारत हा एक भाग असून यासाठी सर्व आजी ,माजी पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे.आणि यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून ही भव्य प्रशासकीय इमारत आज दिमाखात उभी आहे.
या उदघाटन सोहळायनिमित्त सकाळी 10 वाजता सत्यनारायण महापूजा, 1 वाजता आरती 1.30 महाप्रसाद, साय.5 वाजता मान्यवरांच्या हस्ते उदघाटन,6 ते 8 कर्मचाऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम 8.30 वाजता डबलबारी असे कार्यक्रम होणार आहेत तरी ह्या सर्व कार्यक्रमांचा लाभ तालुक्यातील सर्व लोकांनी घ्यावा असे आवाहन सभापती मनोज रावराणे व उपसभापती प्रकाश पारकर यांनी केले आहे