You are currently viewing मम राजहंस हा निजला ….

मम राजहंस हा निजला ….

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना

पाचट आहे पहा पाळणा तुजला …
मम राजहंस हा निजला….

ऊन वारा नि पावसात
तुज अवकाशाचे छत
धरणीमाता जोजविते बघ तुजला ….
मम …….

आई ती तोडते ऊस
तू पाचाडावर खुष
दुपटे नाही,उघडा तू गारठला
मम …..

कष्ट ते किती नशिबात
दुनियेची नाही साथ
उघड्यावरती सोडून बघ ना तुजला
मम …..

किती गाढ तू निजला बाळा
संकटाशी म्हणशी पळा
तू नमवूनि,बघ रे कळीकाळाला
मम …

 

तू वाढ असा रे मुक्त
गा आकाशाचे सुक्त
हो मोठा नि सुखवी मायबापाला
मन राजहंस हा निजला ….

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २७ ॲाक्टोबर २०२१

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =