सध्या दिवाळीपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप सुरू असून, त्याकडे पालकमंत्री खासदार व आमदार यांचा जरासुद्धा लक्ष नसून फक्त विरोधकांची उणीधुणी काढण्याकडे वेळ वाया घालवताना दिसत आहे. एसटी चा प्रत्येक कर्मचारी हा पद्मश्री मिळावा इतका प्रामाणिक व स्वतःच्या जीवावर उदार होऊन काम करणार आहे, व ते लोकांनी कोरोना च्या काळात अनुभवलेले आहे .
अशा कठीण प्रसंगी सुद्धा जीवाची परवा न करता या लोकांनी प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून काम बजावलेली आहे .
अशा परिस्थितीमध्ये तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला व त्यातल्या त्यात कुडाळ तालुक्याला लोकांना अभिमान वाटावा अशा माणसांनी पद्मश्री किताब मिळवला असला तरी खासदारांनी जेवढा वेळ त्यांच्या स्वागतासाठी खर्च केला, त्यातले पाच टक्के वेळ त्यांनी जर का एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाण्यासाठी घालवले असते तर ते कायमस्वरूपी एसटी कर्मचाऱ्यांच्या लक्षात राहिले असते, पालकमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दुजाभाव दिला व त्यांना जर कमी लेखाची चुकी केली तर त्याचा परिणाम त्यांना प्रत्येक निवडणुकीत दिसल्या शिवाय राहणार नाही. इतर सर्व गोष्टींकडे वेळ असलेल्या खासदार व पालक मंत्र्यांना जर का एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेळ नसला तर जिल्ह्यामधील प्रत्येक एसटी आगारा मधून त्यांच्याविरुद्ध आक्रोश आंदोलन केले जाणार असल्याची माहिती नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी दिली आहे.