महाराष्ट्र क्रांती संघटनेच्या सोशल मीडिया प्रमुखपदी पत्रकार संजय शेळके…

महाराष्ट्र क्रांती संघटनेच्या सोशल मीडिया प्रमुखपदी पत्रकार संजय शेळके…

वैभववाडी

महाराष्ट्र क्रांती संघटनेच्या सोशल मीडिया प्रमुखपदी संजय शेळके यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या कार्याच्या प्रसाराचे काम त्यांनी सोशल मीडियाद्वारे चांगल्या प्रकारे केले होते. त्यामुळेच त्यांना संघटनेच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख पद देण्यात आले आहे.
महाराष्ट्र क्रांती संघटना ही धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी अविरत लढणारी संघटना आहे. स्व. बी. के. कोकरे बापूसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र क्रांती संघटना प्रमुख पी. बी. दादा कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील कित्येक वर्षे समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत असताना तळकोकणात आपला विस्तार वाढवत आहे. समाजातील गोरगरीब बांधवांच्या मदतीला धावत आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवत रान पेटवत संघटनेची घोडदौड होत आहे.
त्याचवेळी संघटनेचा विचार सोशल मीडियाद्वारे तळागाळापर्यंत पोहोचणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील वैभववाडी तालुक्यातील पत्रकार, कोकणातील धनगर वस्त्यांच्या विकासाबाबत आपल्या लेखणीने शासनास सदोदित जागे करणारे संजय शेळके यांची महाराष्ट्र क्रांती संघटना सोशल मीडिया प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. त्यांचे महाराष्ट्र क्रांती संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा