You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोबाईल वर चालतो “ड्रीम इलेव्हन” ऑनलाईन कॅसिनो

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोबाईल वर चालतो “ड्रीम इलेव्हन” ऑनलाईन कॅसिनो

*जुगाराचा बादशाह टिंगेल मेंथेरो मुख्य सूत्रधार*

 

सिंधुदुर्ग जिल्हा गेली काही वर्षे अवैध धंद्यांचे केंद्र बनत चालला आहे. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात आलेले एसपी प्रसन्ना यांनी जिल्ह्यातील गैरधंदे मुळासहित उखडून टाकत खाकी वर्दीलाही शिस्त लावली होती. त्यांच्या कारकिर्दीत गैरधंदेवाल्यांचे धाबे दणाणले होते, परंतु त्यानंतर आलेल्या अधिकाऱ्यांच्या काळात पोलिसांचा तो धाक दिसून आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात गैरधंद्यांनी घट्ट पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली आहे. सध्या जिल्ह्यात कार्यरत असलेले पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे हे शिस्तप्रिय आहेत परंतु तरीही जिल्ह्यात दिवसेंदिवस गैरधंदे फोफावताच चालले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने “ड्रीम इलेव्हन” नावाचा ऑनलाईन कॅसिनो हा जुगाराचा खेळ मोबाईलच्या माध्यमातून सुरू झाला असून कणकवली येथील प्रसिद्ध जुगाराचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा टिंगेल मेंथेरो हाच त्याचा मुख्य सूत्रधार आहे. ऑनलाईन कॅसिनो या खेळाचे टिंगेल मेंथेरो याने नाशिक येथे ट्रेनिंग घेतले असून ऑनलाईन रमी कॅसिनो प्रकारातील हा एक प्रकारचा जुगाराचाच खेळ आहे. या कॅसिनोच्या खेळात टिंगेल मेंथेरो सोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार भागीदार असून या ऑनलाईन जुगाराचे नाशिक कनेक्शन आहे. नाशिक येथून हा खेळ चालविला जात असल्याचे पुढे येत आहे.
टिंगेल मेंथेरोने या ऑनलाईन कॅसिनो च्या जुगारात मिळविले तब्बल ३५.०० लाख रुपये. मिळालेल्या झटपट पैशांच्या जोरावर टिंगेल मेंथेरोने नवी इंनोव्हा कार बुक केली आहे. ऑनलाईन जुगाराच्या कॅसिनो मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांचा वावर मोठ्या प्रमाणावर असून तरुणांना गैर धंद्याला लावून टिंगेल मेंथेरो सारखे जुगारी मात्र ऐश करत असून खाकी वर्दी वाले हातावर हात धरून जिल्ह्याची होत असलेली अधोगती डोळे मिटून पाहत आहे. जिल्ह्याचे पोलीस प्रमुख राजेंद्र दाभाडे यांच्याकडून जिल्ह्याला मोठ्या अपेक्षा आहेत. जिल्हावासीयांच्या अपेक्षांवर नक्कीच जिल्हा पोलिस प्रमुख खरे उतरतील अशी जिल्हावासीयांना आशा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा