सिंधुदुर्ग
राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाला ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने पाठींबा दिला आहे.राज्य सरकारने या कर्मचा-यांच्या मागण्या मान्य न केल्यास महासंघ कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
एसटीच्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. गेले चार दिवस सुरू असलेल्या या संपात कोणताही तोडगा निघाला नाही.या संपाला ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने पाठींबा दिला आहे.तसेच महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमोल जंगले,रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विजय गोरे,रायगड जिल्हा अध्यक्ष आनंदराव कचरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एसटी कर्मचा-यांच्या मागण्यांचा राज्य सरकारने सहानुभूतीने विचार करावा अशी मागणी केली आहे.
कर्मचाऱ्यांचा मागण्या मान्य करून एसटी सेवा सुरळीत करण्यात यावी व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली. राज्य सरकारने तोडगा न काढल्यास महासंघ एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा देखील दिला आहे.