You are currently viewing स्टेट बँकमध्ये माजी सैनिकांसाठी सुरक्षा रक्षक पदभरती

स्टेट बँकमध्ये माजी सैनिकांसाठी सुरक्षा रक्षक पदभरती

सिंधुदुर्गनगरी

भारतीय स्टेट बँकेमध्ये माजी सैनिकांसाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली.

            भारतीय स्टेट बँकेमध्ये माजी सैनिकामधून सुरक्षा रक्षाकांची पदभरती करण्यात येणार आहे. त्यासाठी वयोमर्यादा- 1 ऑक्टोबर 2021 रोजी  45 वर्षापेक्षा कमी असावी, शैक्षणिक पत्राता- कमीत कमी 8 वी पास ते 15 वी पास नसावा. सैन्य दलातील 15 वर्षे सेवा झालेली असावी. हुद्दा- हॉव्ह ॲन्ड बीलो, चारित्र्य चांगले असावे, वैद्यकिय पात्रता सेफ-1 असावी. तरी इच्छिूक सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या उमेदवारांनी आपले डिस्चार्ज बुक, ओळखपत्र, इम्पलॉयमेंट कार्डसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे सोमवार दि. 15 नोव्हेंबर 2021 रोजी प्रत्यक्ष भेटून आपले नाव नोंदणी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा