सातार्डे मध्यवर्ती संघ मुंबई संचलीत म. गां. वि. मं. हायस्कूल सातार्डा शाळेचा “हिरक महोत्सव” (६० वर्षे) वर्षाचे औचित्य साधून संजय पिळणकर व मित्रमंडळ यांच्या संकल्पनेतून, माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता सातार्डा हायस्कूल येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तरी या रक्तदान शिबिराला सर्व माजी विद्यार्थी व मित्र मंडळ यांनी शिबिरात भाग घेऊन रक्तदान करून शाळेचे हे हिरक महोत्सवी वर्ष साजरे करावे आणि त्याची शान वाढवावी असे, आवाहन संजय पिळणकर व मित्रमंडळ यांनी केले आहे.
इच्छुक रक्तदात्यांनी डी.एन. मांजरेकर सर 9421265751, पप्पी कवठणकर 9545837182 / 8329437569, उमेश कांबळे 7798928114, रुपेश साळगावकर 9823841284, बाबली गवंडे 8390905269 यांच्याशी संपर्क साधावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी.