अखेर तळेरे हायस्कूल समोर पादचारी पथ व बॅरिके्टस बसविण्याच्या कामास प्रारंभ
तळेरे
वामनराव महाडीक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच इतर दोन शैक्षणिक संस्था कार्यरत असल्याने याठिकाणी पादचारी पुल व्हावा, पादचारी पथ व याठिकाणी बऍरिकेट्स बसविण्याच्या मागणीसाठी तळेरे येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी काही दिवसांपूर्वी संबंधित प्रशासनाच्या विरोधात बेमूदत उपोषण केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन महामार्गावर याठिकाणी पादचारी पथ व बॅरिके्टस बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आल्याने राजेश जाधव यांचे उपोषण ख-या अर्थाने कामी आले आहे.
तळेरे येथील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या शैक्षणिक संकुलादरम्यान पादचारी पथ तयार करणे व बॅरिकेट्स बसविणे या कामास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी पंचायत समिती कणकवलीचे विद्यमान सदस्य तथा माजी सभापती श्री. दिलीप तळेकर, तळेरे माजी सरपंच श्री. शशांक तळेकर, तळेरे उपसरपंच श्री. दिनेश मुद्रस, सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेश जाधव, श्री. रोहित महाडिक, श्री. बली तळेकर, वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. नलगे, के सी सी ठेकेदार कंपनीचे श्री. द्विवेदी आदी उपस्थित होते.
फोटो:१०/११/२०२१
तळे हायस्कूल समोर संबंधित ठेकेदार काम सुरू केल्यानंतर सोबत तळेरेतील सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव व इतर
छाया:- दत्तात्रय मारकड