You are currently viewing पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेला व्हावा – ऍड प्रसाद करंदीकर

पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेला व्हावा – ऍड प्रसाद करंदीकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बँकांना निवेदन सादर

कणकवली

सध्य स्थितीत कोरोनामुळे सामान्य नागरिकांची तसेच व्यावसायिकांची परिस्थिती खूप बिकट बनलेली आहे. यासाठी शासनाच्या धोरणानुसार अर्थ साहाय्य करण्याची नितांत आवश्यकता आहे. जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा सुरु करण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. मात्र सोने तारण कर्जाच्या मागे असलेल्या बँका मुद्रा लोन नाकारत असल्याचे निर्दशनास आल्यानंतर महाराष्ट्र कर्जदार, जमीनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बँकाना मुद्रा लोन वितरित करण्याबाबत निवेदन देण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे एक हजार तरुणांना मुद्रा लोन चा फायदा करून देण्याचा आपला मानस असल्याचे करंदीकर यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात देवगड कणकवली व वैभववाडी या तीन तालुक्यातील बँक व्यवस्थापकांना या समिती मार्फत निवेदन देण्यात आले आहे. गरजू लोकांनी तथा तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र् कर्जदार जमीनदार हक्क बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड. प्रसाद करंदीकर यांनी केले आहे. जनतेच्या सेवेसाठी या समितीचे पदाधिकारी प्रत्येक तालुक्यात असून ते जनतेला सहकार्य करणार असल्याचे करंदीकर यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र कर्जदार, जमीनदार, हक्क बचाव संघर्ष समितीचे रुपेश जाधव, समीर आचरेकर, अनंत पिळणकर, विनायक सापळे, अविनाश पराडकर, कमलेश चव्हाण, सादिक डोंगरकर, संदीप कांबळे, गुरु कांबळे, राजेश साळगावकर, संदेश मयेकर, जलाल डोंगरकर, चेतन चांदोस्कार, अजय जाधव, रोशन जाधव, राजू सावंत, विनोद डगरे, सचिन पवार, सतीश जाधव, प्रसाद मुळे, माधवी मिठबावकर, दिव्या साळगावकर, आदी सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा