महागलेल्या विमानप्रवासामुळे प्रवाशांमधून व्यक्त होतेय नाराजी…!
कणकवली
चिपी विमानतळ सुरू झाल्याने कमी वेळात सिंधुुदुर्गातून मुंबई गाठणे सोपे झाले आहे. मात्र, आता विमान प्रवासाचे तिकीट दर वाढल्याने विमान प्रवास महागला आहे. त्यामुळे विमान प्रवास करणार्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
चिपी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे लोकार्पण नुकतेच पार पडले. त्यानंतर मुंबईतून चिपी अशी विमान सेवा सुरू झाली. या सेवेला सिंधुदुर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता विमान प्रवासाचे तिकीट दर वाढल्याने विमान प्रवास महागला आहे. विशेष म्हणजे हे विमानतळ उडान योजनेंतर्गत असताना देखील तिकीटाचे दर वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल होत आहेत. काही पर्यटक विमानातून जिल्ह्यात येत आहेत. आता विमानाचे तिकिटात भरमसाठ वाढ झाल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मुंबईतून कमी वेळात सिंधुदुर्गात येणे हे विमानसेवेमुळे शक्य झाले आहे. मात्र, महागलेला विमान प्रवाशांमुळे नाराजी व्यक्त होत आहे.