You are currently viewing सखे

सखे

  • Post category:लेख
  • Post comments:1 Comment

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक कवी प्रो.डॉ.प्रवीण उर्फ जी आर जोशी यांचा अप्रतिम लेख

प्रिये –
प्राणप्रिय सखे , किती दिवसांनी आलोय तुझ्या दरबारात , तुझा शामियाना पाहुन बेधुंद झालो . तुझ्या मोहक सौंदर्याने भुरळ च घातली , काय तुझ्या बटा , बटात लपणारी गालावरची खळी , तुझं मोहक हास्य , तुझे विशाल डोळे त्यावरची महिरपी भुवया , नाजुक ओठ ओठा आड डाळिंबाचे दाणे त्यात ला कुंद कळी दात , लालचुटुक जीवणी
खालच्या जीवणीत असलेला धनुष्यकार , डोळ्यांचे मदन बाण , तुझे खांद्यावर रुळणारे कुरळे केस . काय काय सांगु तुझ्या बद्दल , लेखणी पण बोथट होते ! जणु तु स्वर्गीय
नखशिखांत अप्सरा च तर .
तुझा असलेला विशिष्ट सुगंध त्यानं मन कस बेजार होत . धुंद फुंद होत ते तुझ्या आकर्षक कमनीय बांध्याने ! ये ये जवळ ये तुझ्या विध्यापिठात काही कमी पडणार नाही मला .
तुझ्या नक्षत्रांची उधळण कर , तुझ्या नाजुक पुष्पांची अशीच पखरण चालु ठेव . आज शृंगाराचा मनमुरादपणे आंनद लुटू दे.
कुठेही कमतरता नको .आज मनसोक्त आस्वाद घ्यावा वाटतो तुझ्यातल्या कल्याणी चा,
तुझ्या पवित्र अश्या नक्षत्र धारेत स्नान करायचे आहे , तुझ्या मुलायम फुलातील गंधाची चव घ्यावी म्हणतो . तुझ्या पाकळ्यात येऊन भ्रमर होऊ दे मला . तुझ्या कमळ कोष्यात गुरफटू दे मला . नन्तर तुझ्या कोष्यातच मृत झालो तरी चालेल .
खुली कर कवाडे तुझ्या मनाची , दरबाराची , शामियाना ची तुझ्या बाहुपाशात तर मला विश्व दर्शन घडते . तुझ्या मेघ डंबरी महिरपी विश्वात विसावा घेऊ दे .
मला एकतर्फी प्रेम शृंगार नको , बलात्कार पण नको, तुझ्या प्रेमचंदण्यात अलवार भीजु दे . तुझ्या चांदण्याचे शिंपण कर . तुझ्या गंधाने माती भिजेल ओली होईल , वारा पण गंधित होईल . हाच तर निसर्गाचा नियम आहे ना ?
विचार , विचार खुश्या ल विचार ! त्या लता वेलींना,
त्या पानांना , फुलांना फुलांच्या रंगांना त्यांचं अस्तित्व कश्या साठी आहे ?
अग्र कुसुमाना विचार , गुलाबाला विचार गुलबकावली ला पण विचार , निसर्गात जे अव्याहत चालु आहे त्या काळा ला विचार काल पुरुषाला पण विचार . निसर्गातील चंद्र चांदण्यांनी पण निसर्ग नियम कधी मोडले नाहीत .
मग तु व मी तर ह्या गोष्टींचे काही वर्षांचे तर साक्षीदार आहोत ना ! आपलं पण नाव कोरले जाईल इतिहासात ! नियम बाह्य तर मुळी करत नाहीत हो आपण ! सर्व काही अनादी अनंत काल चालत आलेली ही प्रेम भावना फक्त अन फक्त निसर्गात च आहे हे त्रिवार सत्य !!

प्रो डॉ जी आर( प्रवीण )
जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
अंकली बेळगांव
कॉपी राईट

This Post Has One Comment

  1. डॉ जी आर जोशी

    धन्यवाद सर

प्रतिक्रिया व्यक्त करा