– मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब
कालच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदय सामंत म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ने ४३ कोटी आम्हाला विश्वासात न घेता परस्पर पाठवले. त्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेच्या आमदारावर ताण येत आहे. व या संदर्भात त्यांनी जिल्हा परिषद कडे खुलासा मागितलेला आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना मला विचारायचे आहे की ४३ कोटी जर खर्च झाले नाही, ते परस्पर पाठवले गेले मग तुमच्या पक्षाचे गटनेते, जिल्हा परिषद सदस्य काय खुर्च्या गरम करायला जिल्हा परिषद मध्ये येतात ??यात काही जण अनुभवी आहे आमचे म्हणणे आहे त्यांच्यावरही कारवाई करा, आज ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत जिल्हा परिषद रस्त्याचा विषय आहे ,दवाखाने अपुरे डॉक्टर्स, स्टाफ, ग्रामीण भागातील स्ट्रीट लाईट, या सर्व प्रश्नांवर उत्तर कोण देणार? सत्ताधारी विरोधक आरोप प्रत्यारोप जनता उपेक्षित अशी परिस्थितीती आहे सर्व .
गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट होते .आणि राज्य सरकार कडून जो निधी (ग्रँड) ही जिल्हा परिषदेला वर्ष अखेरीस म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटी मिळाला. मग आपल्याच राज्य शासनाकडूनच पत्र आले की यापूर्वी मान्यता मिळालेल्या सर्व कामांना स्थगिती देण्यात येत आहे. मग ती कामे सर्व स्थगित करण्यात आली.. प्रशासकीय कार्यालय 50% क्षमतेने चालु होती हे सर्व आदेश कोणाचे होते ..अशा या विषयामुळे निधी अखर्चित राहिला त्यामुळे या जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी पालक मंत्री म्हणून आपल्यावर आहे. त्यामुळे आपण या गोष्टीकडे यापूर्वी विचारपूस केली पाहिजे होती. आता जिल्हा नियोजन च्या सभेला अवघे ७ दिवस शिल्लक असताना असे वक्तव्य करणे चुकीचे आहे .आज ग्रामीण भागात ग्रामपंचायतीने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे नुसता खुलासा नको. तर जनतेला कळू द्या की जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी किती अभ्यासू आहेत .त्यांना पुन्हा कसे निवडून द्यावे, असा प्रश्न येथील सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
यावरून असे सिद्ध होते की जिल्हा परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक दोघेही कुचकामी अाहेत . त्यामुळे आज जिल्हा परिषदची अवस्था आंधळ दळतंय आणि कुत्र पिठ खातं अशी झाली आहे. यावरून जनतेने लक्षात ठेवावे व भविष्यात कसे लोकप्रतिनिधी निवडावे