You are currently viewing हवे हवे पण

हवे हवे पण

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गझलाकार अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना

आयुष्यातिल या मुक्कामी
हवे हवे पण हरवुन गेले
खंत नसे पण कारण आधी
नको नको ते ठरवुन‌केले ……

दोन जिवांच्या अर्थ प्रीतिचे
जसे जसे मज कळून आले
स्पर्श, भाव त्या प्रथम भेटिचे
तसे तसे मग जुळून गेले ……

आज पाहता तुला जवळुनी
कधि कधी मन मागे जाते
त्या रूपाच्या स्वप्न मोहिनीत
मधी मधी मग जागे होते ……

काळ बदलला वेळ ही सरली
जरा जरा मन हलके झाले
कळे आजवर जे अनुभवले
भरा भरा क्षण परके झाले …..

जीवनांत तू येण्या आधी
बरे बरे जे उगिच वाटले
तुझ्या विना जग माझे नव्हते
खरे खरे ते कधीच पटले
आयुष्यातिल या मुक्कामी
हवे हवे पण हरवुन गेले…..

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा