You are currently viewing मन फुलाचे ….

मन फुलाचे ….

मन फुलाचे ही कविता श्री.पांडुरंग कुलकर्णी या कवीची आहे.संवेदनशील कवितेचे सगळे गुणधर्म या कवितेत आपल्याला दिसून येतात.
ज्यांना झाडे,वेली,
निसर्गालाही मन आहे,विचार आहेत अस वाटत.कवितेत निसर्गाच वर्णन त्यांनी केल आहे.
कवी म्हणतात ओलेता निसर्ग, नुकताच पडून गेलेला पाऊस,ओली झालेली ,चिंब भिजून थरथरणारी झाडं,जणू प्रणयलयीवर थरथरत आहेत.ती प्रणयामधे धुंद असताना खट्याळ वारा ओलसर पानांना छेडून जातो,कळीचे फुल वा-याच्या स्पर्शाने उमलत जाते…..अशी रम्य कल्पना त्यांनी केलीय.
“धुंद ओलसर पानांमधुनी
वारा जेंव्हा गेला अलगद
तो थरथरला प्रणयलयीवर
फुल कळीतुन होते उमलत
पुढे ते म्हणतात.. दवबिंदू आरसपाणी म्हणजे पारदर्शी होऊन वा-यासंगे उडून गेलाय…पावसाच्या आगमनाने मोरही आनंदीत होऊन पिसारा फुलवतोय.
आरसपाणी दवबिंदुमधी
चिंबचिंब भिजलेला वारा
मदन पिवुनी उडुनी गेला
मयुराचाही फुले पिसारा…….
हे सगळ नयनरम्य दृश्य आकाशात कडाडणारी विज डोळे विस्फारून पहाते आणि पावसाच्या थेंबालाही जाऊन काय चाललय ते पाहून ये अस सांगतेय.फुलं फुलतात, तरुण होतात त्याच्याकडे इंद्रधनुष्य ही मोहीत होऊन पहातेय आणि इंद्रधनुष्याकडे लाजून पहाताना ते फुल स्वतःच्याच स्वप्नात रंगून जातय. पाण्याचा आवाज कोकिळेने तान घ्यावी तशी मधूर वाटतात,कृष्णाच्या बासरीमुळे फुलांची तनु मोहरतेय…
पुढे ते म्हणतात फुलांना सात्विकतेची साथ मिळाली की ते स्वतःला सावरते आणि आता हे फुललेल जीवन कृष्णा चरणी स्वतःला अर्पण कराव….हा उदात्त विचार फुलांच्या मनी येतो.कलिकेचे ते फूल जाहले

कोकीळेच्या तानांमधुनी
पाण्याच्याही सुंदर ताना
मोहरत होती तनु फुलाची
जेव्हा पावाहरीओठाला
सात्विकतेची साथ मिळाली
चराचरात देव आहे आणि सात्विकतेची ती खूण आपल्या मनाला मात्र विविध रुपातून पटली पाहिजे.

सौ.मानसी मोहन जोशी
ठाणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × one =