मालवण
येथील चिवला बीच समुद्रात बुडणाऱ्या पिंपरी-पुणे येथील एका ५७ वर्षीय महिला पर्यटकास स्थानिका तरुणांनी वाचविल्याची घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान घडली.
पर्यटनासाठी पुण्याहून २० जणांचा ग्रुप चिवला बीच येथे आला होता. सकाळी हे सर्वजण चिवला समुद्रात आंघोळीसाठी उतरले होते. यात एक ५७ वर्षीय महिला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असल्याचे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या निदर्शनास येताच फ्रान्सिस फर्नांडिस, सागर धुरी, स्वीटन सोज, कृष्णा सावंत यांनी घटनास्थळी धाव घेत त्या महिला पर्यटकाला सुखरूप किनाऱ्यावर आणले. तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.