न्हावेली (ता.सावंतवाडी) येथील ज्येष्ठ नागरिक आणि न्हावेली गावातील पहिले अभियंता म्हणून ओळखले जाणारे कै.सावळाराम गंगाराम नाईक यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी अल्पशा आजाराने २५ ऑक्टोबरला गोवा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच निधन झाले. लघु पाटबंधारे विभागात त्यांनी प्रकल्प अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. टाळम्बा प्रकल्पातून अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले कै. सावळाराम नाईक यांनी निवृत्तीनंतर देवस्थान समिती अध्यक्ष म्हणून न्हावेली येथील मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी अतुलनीय योगदान दिले होते.
*झिजविला देह तुम्ही चंदनापरी*
*सुगंध तेवढा उरला आज आमच्या उरी*
*आठवण तुमची येईल क्षणोक्षणी*
*स्मृती तुमच्या उरतील सदैव आमच्या मनी*
समाजात वावरताना आपल्यासारखंच इतरांनीही शिकून मोठं व्हावं म्हणून झटणारे, वेळ प्रसंगी मदत करणारे, देवस्थान समिती अध्यक्षपदी असताना मंदिर जीर्णोद्धार करण्यासाठी मेहनत घेणारे असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले कै. सावळाराम नाईक हे जगाचा निरोप घेऊन वैकुंठवासी झाले त्याला आज बारा दिवस पूर्ण होत आहेत.
कै. सावळाराम गंगाराम नाईक यांना त्यांच्या बाराव्या दिवसाच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने साश्रु नयनांनी भावपूर्ण आदरांजली…