You are currently viewing सिंधुदुर्ग प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा लवकरच…

सिंधुदुर्ग प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा लवकरच…

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ४५ वर्षावरील क्रिकेटपटूंसाठी आयोजन

मालवण :

१३ नोव्हेंबर रोजी “सिंधुदुर्ग प्रीमियर लीग” आयोजित करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यातील ४५ वर्षावरील टेनिस क्रिकेट खेळाडूंसाठी मालवण येथे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात याचे आयोजन होणार आहे.

२६ ऑक्टोंबर रोजी सावंतवाडी येथे आयोजित सभेत मालवण तालुका हौशी क्रिकेट असो.चे वासुदेव वरावडेकर यांनी ज्येष्ठ क्रिकेटपटूंसाठी सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात यावे अशी संकल्पना मांडली होती. या संकल्पनेला जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
या पार्श्वभूमीवर स्पर्धेच्या व्यवस्थापनाबाबत चर्चा करण्यासाठी सिल्वर सॅंड हॉटेल मालवण येथे सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पप्पू परब, उमेश मांजरेकर, बाबा परब, रिझवान शेख, सुशील शेडगे, वासुदेव वरवडेकर, मंगेश धुरी, आशिष शेलटकर, निळकंठ मालणकर, आपा मालंडकर, विक्रम मोरे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी नियमावली ठरवण्यात आली आहे. या लीगमध्ये १० संघांचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्‍यातील २५ याप्रमाणे ६ तालुक्यातील १५० खेळाडूंची निवड करण्यात येईल. फॉर्म्स च्या आधारे प्रत्येक तालुक्याच्या संघाच्या आयकॉन कडून लिलाव पद्धतीने १५ खेळाडूंची निवड करण्यात येईल. प्रत्येक संघात ४५ ते ५० वयोगटासाठी ५ खेळाडू तर १ राखीव खेळाडू, ५० ते ५५
वयोगटासाठी ४ खेळाडू तर २ खेळाडू राखीव, ५५ वर्षावरील वयोगटात २ खेळाडू तर १ खेळाडू राखीव याप्रकारे संघाची रचना असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =