You are currently viewing मालवणच्या निशा सोलकरचा मुंबईत डंका!

मालवणच्या निशा सोलकरचा मुंबईत डंका!

मुंबई दादर हिंदू कॉलनी येथील आयईएस दिगंबर पाटकर गुरुजी विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आणि नॅशनल टायकोंडो कराटेपटू निशा प्रमोद सोलकर हिने बी पी सी ए कॉलेज वडाळा येथे पार पडलेल्या मुंबई डिस्ट्रिक जूनियर अंड सेनियर क्योरुगी अँड पूम्से टायकोंडो चॅम्पियनशिप २०२१ मध्ये मुलींच्या ज्यूनियर गटामध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. मालवण तालुक्यातील रामगड गावची निशा सुकन्या आहे. तिने अंतिम फेरीत कनक घाडीचा पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली.

ही मानाची स्पर्धा मुंबई येथील प्रसिद्ध बी के एस अकॅडमीने आयोजित केली होती. या स्पर्धेत १०० स्पर्धक सहभागी झाले होते. निशा ही परेल येथील चिल्ड्रन टायकोंडो अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत आहे. चिल्ड्रन तायक्कॉंदो अॅकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक सिद्धेश जाधव, संकेत भोसले, सुरेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले. विविध शालेय, जिल्हा, राज्य, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल पटकावले आहे. तिला वडील प्रमोद सोलकर आणि आई पूजा सोलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.महिला दशावतार कलाकार म्हणून सुद्धा निशा हिची ओळख आहे. निशा हिच्या यशाबद्दल मसुरे, रामगड येथून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा