सावंतवाडी
बांदा-दोडामार्ग रस्त्याची पुन्हा निविदा काढण्यात येणार आहे. कंत्राटदाराकडुन अपेक्षित प्रतिसाद न आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व मक्ते रद्द करण्यात आले आहेत अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.
दरम्यान मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल आणि एसटी डेपो ही कामे मंजूर होण्यासाठी आता प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आता कठोर भूमिका घेउन काही अधिका-यांच्या बदल्या सुध्दा करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. श्री. केसरकर यांनी आज या ठीकाणी पत्रकार परिषद घेतली.