You are currently viewing भारतीय सैन्याची ताकद काय आहे, याचा अंदाज शत्रूला…

भारतीय सैन्याची ताकद काय आहे, याचा अंदाज शत्रूला…

दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी सीमेवर तैनात जवानांच्या भेटीसाठी, दिवाळी साजरी करण्यासाठी नौशेरा सेक्टरच्या दौऱ्यावर आहेत. नौशेरामध्ये त्यांनी तैनात असलेल्या जवानांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना आपण नौशेरामध्ये पंतप्रधान म्हणून आलेलो नसून इथल्या जवानांच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून आलो असल्याचं मोदी म्हणाले. “प्रत्येकाला वाटतं की आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करावी. मलाही वाटतं की मी दिवाळी माझ्या कुटुंबासोबत साजरी करावी. म्हणूनच मी इथेदिवाळी साजरी करतो. कारण तुम्ही माझे कुटुंबीय आहात. मी इथे पंतप्रधान म्हणून आलेलो नाही. मी तुमच्या परिवारातला एक सदस्य म्हणून आलोय. आपल्या कुटुंबियांसोबत आल्यानंतर जसं वाटतं, तसंच तुमच्यासोबत आल्यावर मला वाटतं”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

“मी एकटा नाही आलोय. मी माझ्यासोबत १३० कोटी देशवासीयांचे आशीर्वाद तुमच्यासाठी आणले आहेत. आज संध्याकाळी भारताचा प्रत्येक नागरीक दिवाळीनिमित्ताने एक दिवा लावून तुमच्या वीरत्वासाठी, तुमच्या शौर्यासाठी, तुमच्या पराक्रमासाठी लावून तुम्हाला अनेकानेक शुभकामना देईल”, असं देखील मोदी यावेळी म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + thirteen =