You are currently viewing कोचरे गावाला निधीची कमतरता पडू देणार नाही : आमदार दिपक केसरकर

कोचरे गावाला निधीची कमतरता पडू देणार नाही : आमदार दिपक केसरकर

वेंगुर्ला

वेंगुर्ला तालुक्यातील कोचरा येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या उंबराचे पाणी येथील रस्ता सुधारणा व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोचरे गावाला विकासाच्या दृष्टीने भरगोस निधी देण्यात आला असून कोचरे ग्रामपंचायत उत्कृष्ट काम करत आहे. त्यामुळे पुढील काळात गावाला विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे प्रतिपादन आमदार दिपक केसरकर यांनी केले.

यावेळी गावच्या वतीने आमदार केसरकर यांचा सत्कार सरपंच साची फणसेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन करण्यात आला. तर कोचरे सरपंच फणसेकर यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याबद्दल हुंबरचे पाणी वासीयांच्या वतीने आमदार केसरकर यांच्या हस्ते सरपंचयांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच प्रतीक्षा पाटकर व माजी उपसरपंच सुशील राऊळ यांचाही सत्कार आमदार केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, सुनील डुबळे, भोगवे माजी सरपंच महेश सामंत, पं. स. माजी सभापती सुनील मोरजकर, प्रकाश गडेकर, शहरप्रमुख अजित राऊळ, नितीन मांजरेकर, आत्मा कमिटी अध्यक्ष देवा कांबळी, सोसायटी चेअरमन चेतन सामंत, कोचरा ग्रा. पं. सदस्य पूजा गोसावी, स्वरा हळदणकर, सरस्वती राऊळ, उपविभागप्रमुख विष्णु माधव, म्हापण उपविभाग प्रमुख वसंत साटम, श्रीरामवाडी शाखाप्रमुख भाई निवतकर, बाळा हंजनकर, कोचरा सोसायटी चेअरमन ब्रिजेश तायशेटये, पोलीस पाटील बापशेट चव्हाण, शाखाप्रमुख आपा राऊळ, प्रदीप राऊळ, शिक्षक तेंडोलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आबा कोचरेकर यांनी तर आभार सरपंच साची फणसेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा