You are currently viewing मणेरी येथील रस्ता तात्काळ दुरुस्त करा; अन्यथा १५ जूनला रास्ता रोको करण्याचा इशारा

मणेरी येथील रस्ता तात्काळ दुरुस्त करा; अन्यथा १५ जूनला रास्ता रोको करण्याचा इशारा

दोडामार्ग

दोडामार्ग बांदा मार्गावरील मणेरी बाजारपेठ ते जठार देवस्थान दरम्यान खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास १५ जूनला रास्ता रोको करण्याचा इशारा मणेरी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे . त्यात त्यांनी कार्यकारी अभियंता अमानिका जाधव , दोडामार्ग उपविभागातील अधिकारी व शाखा अभियंता यांच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे . रस्ता काम अपूर्ण ठेवून नागरीक व चालकांचा जीव धोक्यात वाहन घातल्याबद्दल त्या सर्वांचा त्यांनी निषेधही केला आहे . तसे बेजबाबदार अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालतात त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील काही रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहेत असेही त्यांनी म्हटले आहे . दोडामार्ग ते बांदा मार्गावर महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला नियमबाह्य पध्दतीने काम करायला बांधकामनेच परवानगी दिली आहे . या कंपनीने काम करताना बाजू पट्टी , गटार खोदून पाईप लाईन टाकली त्यामुळे मणेरी बाजारपेठ ते जठार देवस्थान हा जवळपास एक किलोमीटर रस्ता खड्यात गेला आहे .

मणेरी बाजारपेठ येथे दीडशे मीटर रस्ता खचून चर पडला आहे . गेल्यादीड वर्षापासून कार्यकारी अभियंता या उपाययोजना नात्याने अमानिका चव्हाण यांची खचलेला पावसाळ्यात रस्ता दुरुस्ती करणे , खड्डे बुजवून घेऊन वाहतूक सुरळीत करणे त्यांची जबाबदारी होती ; पण त्यांनी पावसाळा आला तरी धोकादायक ठिकाणी कोणत्याही प्रकारची केलेली नाही . त्यामुळे अपघात होऊन वित्त व प्राणहानी होऊ शकते असेही निवेदनात म्हटले आहे . सर्व अधिकारी जे कधीच कार्यालयात उपलब्ध नसतात त्यांनी रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे
…. अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा

कामचुकार ठेकेदारांना आपण संरक्षण देत आहात त्यामुळे तुमची बदली योग्य होती . तुमच्या निष्काळजीपणामुळे मणेरी गावातील मुख्य रस्त्याची वाईट अवस्था झाली आहे . त्यामुळे मणेरी बाजारपेठ ते जठार देवस्थानपर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे १० जून पर्यंत बुजवून रस्ता निर्धोक बनवला नाही तर तर १५ जून रोजी मणेरी येथे गावातील ग्रामस्थ रास्तो रोको आंदोलन करतील होणाऱ्या परिणामास बांधकाम विभाग जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा