You are currently viewing निराश्रित, मनोरुग्ण महिलेला मिळाला संविता आश्रमाचा आधार

निराश्रित, मनोरुग्ण महिलेला मिळाला संविता आश्रमाचा आधार

निराश्रित महिलेला संविता आश्रमाचा आधार वैभववाडी शहरामध्ये गेले दोन वर्षापासून निराश्रित निराधार महिला फिरत होती. सदर महिला उघड्यावरचे टाकलेले अन्न खाऊन जगत होती. खायचे कोणी दिले तर मनात असल्यास स्वीकारत होती. अनेक वेळा रस्त्यावर भटकत असताना वाहतुकीस अडथळा निर्माण करत होती. परंतु उपद्रवी नव्हती त्यामुळे वैभववाडी कराना तिचा त्रास नव्हता परंतु काळजी वाटत होती.

काळजीपोटी अनेकांच्या मनात ती तिला आश्रमाचा आधार मिळावा असे वाटत होते. यातूनच वैभववाडी येथील प्राथमिक शिक्षक दशरथ शिंगारे यांनी संविता आश्रम पणदुरचे संस्थापक संदीप परब यांचेशी संपर्क करून सदर महिलेला आपल्या आश्रमात दाखल करून घेण्यासंदर्भात विनंती केली. त्यानुसार 2 नोव्हेंबर 20 21 रोजी संदीप परब आणि त्यांचे सहकारी उदय कामत, पल्लवी परब, विद्या आणि बबिता दाखल झाले. शिंगारे गुरुजी ना संदीप परब यांनी आले चा फोन केला. व सदर महिलेचा शोध घेण्याचे कळविले. शिंगारे गुरुजीना दोन तासाच्या शोधानंतर वैभववाडी रेल्वे फाटक येथे सदर महिला दिसून आल्यानंतर संदीप परब यांच्या टीमशी संपर्क केला. आणि त्या निराधार महिलेला आश्रमात दाखल करण्याची कार्यवाही सुरू झाली. त्या ठिकाणी काही वेळातच मदत व सहकार्य करण्यासाठी वैभववाडी पोलीस ठाण्याचे कार्यतत्पर पोलीस निरीक्षक अतुल जाधव आपल्या टीम सह उपस्थित राहिले. त्यामध्ये पोलीस हवालदार प्रिती शिंगारे माधुरी अडुळकर पोलीस अंमलदार सोनल गोसावी श्री कांबळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी मोलाचे सहकार्य व आश्रमाला मदत म्हणून वैभववाडी येथील मेडिकल व्यवसायिक संजय सावंत यांनी रु २००० / – ची रोख मदत केली. तसेच पोलीस हवालदार प्रीती शिंगारे व माधुरी अडूळकर यांनी निराधार महिलेला साडी घेण्यासाठी आर्थिक मदत केली. याप्रसंगी वैभववाडी तालुक्याचे माजी सभापती श्रीपात मांजरेकर, वैभववाडी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, वैभववाडी नगरपंचायतीचे नगरसेवक संजय सावंत, व्यापारी संघाचे पदाधिकारी बंड्या सावंत, सामाजिक कार्यकर्ते संजय रावराणे ‘ सूर्यकांत भालेकर चिंचवली, वैभववाडी येथील व्यावसायिक सुनिल कुंभार, अरुण ब्रह्मदंडे हारुण हवालदार, उमेद टिमचे सहकारी दिनकर केळकर आदींनी उपस्थित राहून सदर निराश्रित महिलेला आधार मिळण्यासाठी सहकार्य केले. वैभववाडी करांकडून सविता आश्रमाचे संस्थापक संदीप परब यांच्या अतुलनीय कामगिरीचा गौरव होत आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा