You are currently viewing अवनी..

अवनी..

संस्कृती एन्टरटेन्मेंट निर्मित ‘ अवनी ‘ ह्या लघुपटाचे पोस्टर हे नुकतेच प्रदर्शित झाले असून, लघुपट प्रेक्षकांसाठी लवकरच ओ टी टी प्लॅटफॉर्म पाहायला मिळणार आहे,

लघुपटाची कथा ही नवरा बायकोच्या नात्यावर असून, बायकोला आपण खरच समजून घेतो का ? नवऱ्याच्या दृष्टीने तो तिला सर्व काही देत आहे, पण हा त्याचा गैरसमज असून, जेव्हा तिला खरच त्याची गरज होती तेव्हा त्याने तिच्याकडे पाठ फिरवली, तिच्या एकटेपणाची तिला कुठे तरी जाणीव होऊ लागली होती, त्याच्या पूर्षी अहंकारामुळे तो कुठे तरी कमी पडत होता, ह्याची शेवटी त्याला ही जाणीव झाली.

लघुपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती सिद्धेश शिंदे ह्यांनी केली आहे. तर लघुपटामध्ये वैष्णवी पोतदार आणि नागेश बल्लाळ ह्यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे, लघुपटाचे छायाचित्रण प्रसन्न पिंगे ह्याने केले असून, चिन्मय शिवलकर ह्याने लघुपटाचे संगीत व संकलन केले आहे. प्रोडक्शन हेड म्हणून वर्षा पोतदार ह्यांनी कामाची बाजू सांभाळी असून, प्रोडक्शन मॅनेजर म्हणून श्रुती देशमुख काम करत आहे, लघुपटाचे सहाय्यक दिग्दर्शन प्रेम कानोजिया ह्याने केले आहे, तर आपल्याला सर्वांच्या भेटीला लवकरच ‘ अवनी ‘ हा लघुपट प्रेक्षकांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाहायला मिळणार आहे. लघुपटाचे प्रसिद्धी प्रमुख थर्ड आयचे संपादक नंदलाल पठे हे पाहत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 5 =