जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना
दीप उजळावे, ज्ञानाचे.. लक्षुमी यावी
ती करो सारी भरपाई …..
तम सारा करूनी दूर
सुख स्वप्ना येवो पूर
दारिद्र्य निघोनी जावो
हरएक मनिषा पावो….
पडझड झाली …खूपच झाली बिदाई…
ती करो सारी भरपाई ….
येणार ना परतून मोती
गेलेत पहा सांगाती
साजण कुणाचा गेला
कुणी लेक पोरका झाला …
सावट अजुनी ..करू नका हयगाई…
ती करो सारी भरपाई …
जे झाले गंगा मिळाले
तेवढेच आयुष्य मिळाले
शोक ते करूनी ना येती
दैवाची असते गती
अवती भवती किती किती नवलाई
ती करो सारी भरपाई…
आनंदे करू या सण
नात्यांचे जोडूनी धन
गरीबांवर करू वर्षाव
नवा कपडा नवा फराळ…
खातील लाडू.. चिवडा आणि मिठाई
आपण करू भरपाई……
सण सौख्याचा भरजरी
सुख यावे घरोघरी
वाढवू प्रेमाचे पाश
हरएक करू मृदुभाष
कटुता विसरू .. मानवताच सुखावी ….
ठरवून करू भरपाई ….
पाठीवरती …, राहो हात बधाई
ही सुमतीची हो ग्वाही ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)