मालवण :
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर जिल्ह्यात विकास हा शब्द यांच्या कार्यक्रम प्रत्रिकेतून हरविल्याचा अनुभव जिल्हावासिय अनुभवत आहेत. त्याच बरोबर जिल्ह्याचा क्राईम पण वाढत चाललेला आहे. दोन दिवसापूर्वी भाजपा पदाधिकारी श्री अविनाश पराडकर आणि शेकडो गोवंश कार्यकर्ते यांच्या माध्य्मातून गोवंश कत्तल करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मोरक्याना मुद्धेमालासकट अटक करण्यात आली. चोंकशी अंती गेले एक दिड वर्ष या प्रकारे गोवंश कत्तल करणाऱ्या टोळ्या स्थानिक पातळीवर आपले एजंट नेमून हे विघातक कार्य बिनदिक्कत पणे चालू ठेवलेले आहे. गेल्या काही महिन्यात गोवंश चोरीचे प्रमाण वाढले असून प्रशासकीय कार्यपध्धतीमुळे शेतकरी याबाबतीत तक्रार देण्याच्या मनस्थितीत नसतात. हा प्रकार ज्या मतदार संघात घडला त्या आमदार श्री वैभव नाईक यांनी दोन दिवस होऊनही याप्रकरणी चोकशी करायला वेळ नाही. या भागाचे भाजपच्या मतावर निवडून आलो यांचे भान विसरून भाजपच्या पक्षांतर्गत विषयावर त्वरित भाष्य करून स्वतःची चेष्टा करून घेणाऱ्या खासदार श्री विनायक राऊत यांनीही याविषयी अजून भाष्य केले नाही आहे. किंबहुना यांच्याच आशीर्वादाने अशे प्रकार राजरोज या जिल्ह्यात घडत आहेत अशी शंका या जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना येत आहे. या प्रकरणी जिह्याचे पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांनी त्वरित लक्ष देऊन जिह्यातील या टोळीचा पर्दापाश करून यातील स्थानिक एजंट व यातील समाविष्ट समाजकंटकांना अटक करावी अशी मागणी भाजप जिल्हा प्रवक्ते श्री बाबा मोंडकर यांनी केली आहे .