You are currently viewing हे सूर भावनांचे

हे सूर भावनांचे

*जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे ज्येष्ठ सदस्य, लेखक, कवी, गझलाकार श्री अरविंदजी ढवळीकर यांनी यशवंत देव यांच्या “सूर भावनांचे” या कार्यक्रमासाठी लिहिलेलं अप्रतिम शिर्षक गीत*
(यशवंत देव यांचा १ नोव्हेंबर हा जन्मदिन)

ही भावगर्भ यात्रा करण्यास अधीर झालो
स्वर सात, शब्द सुमने ओवीत मी निघालो
पुसती कुणी कुणाच्या मी दर्शनास आलो
ओठात नाव होते परी सांगण्या विसरलो

आलो जसा इथे मी नगरीत आपुल्या या
कळले मला वसे तो हृदयात रसिकांच्या
मग साद घातली अन शोधल्या खुणा त्या
क्षण सोबतीस द्यावे तुम्हास आळवाया

शब्दातुनी पहावे कधी सौंदर्य कल्पनांचे
गीतात अनुभवावे जणू वर्षाव सौरभाचे
लय ताली अवतरावे प्रतिबिंब चांदण्यांचे
ऐकून तृप्त रसिकांनो व्हा सूर भावनांचे
हे सूर भावनांचे

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा