जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक कवी प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी यांची काव्यरचना
ते गांव सोडले मी
ते दार सोडीले मी
त्या गत काळाच्या गोष्टी
ती वाट सोडली मी
माझेच गणगोत आप्त
झाले कसे विभक्त
काळाचे पडता घाव
झाले होते स शक्त
घेवून ऊँच भरारी
नभी ऊडाला तो पक्षी
कोणीच उरले नाही
माझ्या गोष्टींचे ही साक्षी
काळ बदलला सरले पर्व
गतस्मृतिन्चा नुसता गर्व
चेहरा बदलला रंग ही बदलले
माझ्याच घरात मुखवटे वेगळे
उरल्यात नुसत्या पावुल खुणा
माझ्याच गावात मी
अनाहूत पाहुणा
काळजात आता चंद्रमोळी खुणा
प्रो डॉ प्रविण (जी आर )जोशी
अंकली / बेळगांव