You are currently viewing पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे-परब पुन्हा सिंधुदुर्गच्या राजकारणात सक्रिय

पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे-परब पुन्हा सिंधुदुर्गच्या राजकारणात सक्रिय

पवार कुटुंबियांच्या निकटवर्तीय म्हणून ओळख

राजकीय विशेष

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीने सत्तेत सहभागी होतात राष्ट्रवादीला नवे पंख फुटले. शरद पवारांच्या अनुभवी नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेत पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला. दीपक केसरकर, संदेश पारकर यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी जिल्ह्यातील एकाही राजकीय नेत्याला भरून काढता आली नव्हती. परंतु पिंपरी चिंचवडच्या नगरसेविका, पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा तथा सावंतवाडीची लेक अर्चना घारे-परब यांच्यावर जबाबदारी देत अजित पवार यांनी त्यांना जिल्ह्यात पाठवले होते. जिल्ह्यातील पूरस्थिती इत्यादी गोष्टी व्यवस्थित हाताळत अर्चना घारे यांनी राष्ट्रवादीची बऱ्यापैकी ताकद सावंतवाडी मतदारसंघात उभी केली होती.
मागील विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने बबन साळगावकर यांना उमेदवारी देत अर्चना घारे यांना पुण्यात बोलावल्यानंतर पुन्हा एकदा पक्ष वाढ खुंटली गेली. राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकारचा घटक बनल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीने जिल्ह्यात पाय पसरायला सुरुवात केली आहे. सावंतवाडीत तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी संघटना बांधणी करून विविध विषयांवर आंदोलने करून राष्ट्रवादीची ताकद दाखवून दिली. त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा जिल्ह्यात बहरात आली. त्याचाच परिणाम म्हणजे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते तथा जलसंपदा मंत्री जयंतदादा पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा करून राष्ट्रवादीची मोट बांधण्यास सुरुवात केली. अमित सामंत जिल्हाध्यक्ष झाल्यापासून बाजूला असलेला राष्ट्रवादीचा एक गट अर्चना घारे-परब यांच्या नेतृत्वाखाली आजपासून सक्रिय झाला आहे. अर्चना घारे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने कुडाळ सावंतवाडीत जयंत पाटील यांच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांची गर्दी पहायला मिळाली. त्यात विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय राहिल्यास नक्कीच जिल्ह्यात राष्ट्रवादी पुन्हा जोमाने वाढेल अशी खात्री वाटू लागली आहे. पवार घराण्याचा असलेला विश्वास आणि जवळीक अर्चना घारे यांना नक्कीच जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढविण्यासाठी ताकद देऊ शकेल आणि त्याचेच फलित म्हणजे जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रवादीमय होऊ शकेल असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्याना वाटत आहे. आजच्या जमलेल्या गर्दीवरून नक्कीच राष्ट्रवादीला सुगीचे दिवस येणार यात शंकाच नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा