राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
कुडाळ येथे पत्रकार परिषदेत पाटील यांनी आगामी काळात होणार्या निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढविण्यात येईल, असा दावा केला. यावेळी सावंतवाडी मतदार संघावर उमेदवारीसाठी पक्ष दावा करणार का ?, असा प्रश्न विचारल्यानंतर मी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांचे बोललो, विधानसभेला उशीर आहे. त्यासाठी “मी पुन्हा येईन”, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आयोजित पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.
यावेळी “मी पुन्हा येईन” या शब्दाला मी पर्यायी शब्द शोधत आहे असे सांगून पाटील यांनी महाविकास आघाडीला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करणार्या केंद्र सरकारवर टिका केली. काही करुन त्यांना पुन्हा सत्तेत यायचे आहे. परंतू तसे होणार नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
पत्रकार परिषदेत श्री.पाटील यांनी आगामी निवडणूका या महाविकास आघाडी म्हणनूच लढवू, त्यामुळे सांगणार एक आणि करणार एक, असे करणार नाही, तर सदयस्थिती लक्षात घेता आघाडी करुनच लढविण्याचा निर्णय आहे, असे ते म्हणाले.
यावेळी काही वर्षापुर्वी राष्ट्रवादीचा बालेकील्ला असलेल्या सावंतवाडी मतदार संघावर पक्ष दावा करेल का ?, असे त्यांना छेडले असता ते म्हणाले, मी आघाडी करण्याबाबत बोललो ते पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूकाबाबत अद्याप विधानसभा निवडणूका दूर आहेत. त्यासाठी “मी पुन्हा येईन” ,असे त्यांनी सांगितले. त्यामुळे उपस्थितात हशा पिकला.