You are currently viewing तळेरे येथे पणती कार्यशाळा उत्साहात : 70 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

तळेरे येथे पणती कार्यशाळा उत्साहात : 70 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

तळेरे

तळेरे येथील श्रावणी कंप्युटर एज्युकेशन आणि मेधांश कंप्युटर इन्स्टिट्यूट यांच्यावतीने आयोजित केलेल्या पणती कार्यशाळेला उदंड प्रतिसाद मिळाला. ही कार्यशाळा गुरुवारी तळेरे येथे झाली. त्यावेळी पंचक्रोशीतील 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.


लहान मुलांसाठी आयोजित केलेल्या पणती कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला कार्यशाळेचे मार्गदर्शक पी. एन. काणेकर, डॉ. अभिजित कणसे, पत्रकार उदय दुदवडकर, निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर, वैभव मुद्राळे, सतिश मदभावे, निकेत पावसकर, श्रावणी कंप्युटर एज्युकेशनच्या श्रावणी मदभावे, मेधांश कंप्युटर इन्स्टिट्यूटच्या रिना दुदवडकर आदी उपस्थीत होते.

दिवाळी जवळ आल्याने आपल्या मुलांमधिल कला कौशल्याला वाव मिळावा. आणि मोबाइल पासुन थोडावेळ लांब जाऊन वेगळी मजा अनुभवण्यास मिळावी, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक पी. एन. काणेकर यांनी प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत सहभागी मुलांना पणत्या देण्यात आल्या. त्या मुलांनी आपल्या आवडीनुसार आणि कलेनुसार आकर्षक रंगवल्या. या सर्व पणत्या 31 ऑक्टोबरला तळेरे येथे होणार्या कंदिल महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. या कार्यशाळेला प्रणिल शेट्ये, प्रमोद कोयंडे, दिपक पांचाळ आणि पालकांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − eight =