You are currently viewing ओरोस येथील मटका बिटर ^परत बाईक^ला पोलिसांकडून समज

ओरोस येथील मटका बिटर ^परत बाईक^ला पोलिसांकडून समज

*संवाद मीडियाच्या बातमीने बाईक परत सावध*

दोडामार्ग येथून ओरोस येथे २० वर्षांपूर्वी पोटापाण्याच्या शोधात आलेला परत बाईक याने मटक्याचा व्यवसाय आपल्या सुखचैनी जगण्याचा सहारा बनविला. ओरोस नाक्यावर पत्र्याच्या शेड मध्ये खुलेआम मटक्याचा अवैध व्यवसाय सुरू केला. ओरोस हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून देखील हॉस्पिटल समोर जाऊन बिनधास्तपणे मटका स्वीकारत होता.

परत बाईकचे कारनामे संवाद मिडियाकडे येताच संवाद मीडियाने त्यावर प्रकाशझोत टाकला होता. ओरोस जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर होणारा मटक्याचा खुलेआम खेळ म्हणजे जिल्हा पोलिस अधिक्षकांसाठी देखील आव्हान होते. संवाद मीडियाने दिलेल्या बातमीनंतर *ओरोस पोलिसांनी मटका बिटर परत बाईक याला दिली समज*. पोलिसांकडून समज मिळाल्यानंतर भीतीपोटी परत बाईक याने आपले मटका व्यवसायासाठी वापरण्यात येणारे सहा मोबाईल क्रमांक बंद करून ठेवले आहेत..

पोलिसांनी समज दिल्यानंतर शक्ती कपूर फेम परत बाईक याने चोरीछुपे मटका व्यवसाय सुरू ठेवला आहे. ओरोस येथील एका चिकन सेंटरच्या मागे परत बाईकचा मुलगा मटका स्वीकारायला बसतो. तर परत बाईकचा एक *सोरब* आडनावाचा कामगार ओरोस येथील भाजीवाल्याच्या मागे बसून मटका चिठ्ठी घेतो. शक्ती कपूर स्टाईल परत नाईक याने संवाद मीडियाची बातमी आल्यानंतर स्वतःच्या घरीच बसून मटका घेण्यास सुरुवात केली आहे, तर संवाद मीडियाच्या बातमीनंतर परत बाईकचे दोन मुलगे *लोट्या आणि सोट्या पिलिंद* हे ओरोसमध्ये मटका घेतात.

दीड किलो सोने अंगावर घालून शक्ती कपूर स्टाईल मध्ये लाल रंगाचा पल्सर गाडीने ओरोसमध्ये खुलेआम मटका स्वीकारणाऱ्या परत बाईकने आपला व्यवसाय चोरीछुपे सुरू ठेऊन पोलिसांनी समज देऊनही पोलीस आपले काहीच वाकडे करू शकत नाहीत अशा अविर्भावात मटका सुरू ठेऊन पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या एरियामध्ये जिल्हा पोलिस अधिक्षकांनाच आव्हान दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा