You are currently viewing महाराष्ट्र एस. टी.कर्मचारी संघघटनेच्या संयुक्त कृती समिती सिंधुदुर्ग च्या बेमुदत उपोषण स्थळी खासदार विनायक राऊत यांनी दिली भेट…

महाराष्ट्र एस. टी.कर्मचारी संघघटनेच्या संयुक्त कृती समिती सिंधुदुर्ग च्या बेमुदत उपोषण स्थळी खासदार विनायक राऊत यांनी दिली भेट…

विविध मागण्यांसंदर्भात खासदारांना निवेदन सादर

कणकवली

महाराष्ट्र एस. टी.कर्मचारी संघघटनेच्या संयुक्त कृती समिती सिंधुदुर्ग च्या बेमुदत उपोषण स्थळी खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली. यावेळी विलगिकरण व्हावे, राज्यसरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता दिवाळी पूर्वी मिळाला पाहिजे, वाढीव घर भाडे ८, १६, २४ या दराने मिळाले पाहिजे, सर्व सण भत्ता १२,५०० मिळालाच पाहिजे, वार्षिक वेतन वाढ २ टक्के वरून ३ टक्के मिळावा, न्यायालयाच्या आदेशानुसार ठरलेल्या तारखेला पगार मिळालाच पाहिजे आणि दिवाळी बोनस १५ हजार ५०० रुपये मिळालाच पाहिजे अशा मागण्यांचे निवेदन कर्मचाऱ्यांनी खा.विनायक राऊत याना दिले.

यावेळी खा. विनायक राऊत, जि.बँक. अध्यक्ष सतीश सावंत , अनुप नाईक, अतुल रावराणे, विभागीय सचिव इंटक पांडुरंग गावडे, इंटक कणकवली आगार अध्यक्ष गौरेश लोकरे, कामगार संघटना विभागीय सचिव विनय राणे, कामगार संघटना विभागीय अध्यक्ष अनंत रावले, कामगारसेना महिलाअध्यक्ष मानसी परब, कायदेशीर सल्लागार प्रकाश साखरे, इंटक अध्यक्ष अशोक राणे, कामगार सेना विभागीय सचीव आबा धुरी, अविनाश दळवी, मधू भगत, संतोष चव्हाण, संजय सावंत, रमाकांत जाधव, कृष्णा कुडतरकर, सेना अध्यक्ष सचिव अजित कदम आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा