सिंधुदुर्गनगरी
राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे दि. 30 ऑक्टोबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
शनिवार दि. 30 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9.30 ते 10.30 वा. मोरेश्वर गोगटे सांस्कृतिक भवन, देवगड – जामसंडे येथे कणकवली – देवगड – वैभववाडी विधानसभा मतदारसंघ – राष्ट्रवादी परिवार संवाद आढावा बैठक, सकाळी 10.30 वा. मोटारीने देवगड येथून कणकवलीकडे प्रयाण, सकाळी 11.30 वा. कणकवली येथे आगमन व राष्ट्रवादी काँग्रेस पाट्री कार्यालय कणकवली येथे, कणकवली तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालायचे उद्घाटन समारंभास उपस्थिती, सकाळी 11.30 ते 11.45 वा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय कणकवली येथे कणकवली तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश. सकाळी 11.45 ते 12.00 वा. कणकवली येथे राखीव. दुपारी 12.00 वा. मोटारीने कणकवली येथून कुडाळकडे प्रयाण, दुपारी 12.30 वा. कुडाळ येथे आगमन. दुपारी 12.30 ते 2.00 वा. लेमन ग्रास हॉटेल, कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा जलसंपदा विभाग आढावा बैठक व पत्रकार परिषद, दुपारी 2.00 ते 2.30 वा. राखीव. दुपारी 2.30 ते 3.30 वा. लेमन ग्रास हॉटेल कुडाळ येथे निमंत्रीत कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हा राष्ट्रवादी कार्याकारिणी – राष्ट्रवादी परिवार संवाद आढावा बैठक. दुपारी 3.30 ते 4.30 वा. लेमन ग्रास हॉटेल, कुडाळ येथे कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघ – राष्ट्रवादी परिवार संवाद आढावा बैठक. सायं. 4.30 वा. मोटारीने कुडाळ येथून बांदाकडे प्रयाण. सायं. 5.00 वा. बांदा येथे आगमन. सायं. 5.00 ते 5.30 वा.ओवेस कॉम्पलेक्स, बांदा येथे बांदा येथील नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पूरजन्य परिस्थिती उपाय योजनेसाठी नौका सुपूर्त करण्याच्या कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5.30 वा. मोटारीने बांदा येथून सावंतवाडीकडे प्रयाण. सायं. 6.00 वा. सावंतवाडी येथे आगमन. सायं. 6.00 ते 7.30 वा. समर्थ कृपा हॉल, सावंतवाडी येथे सावंतवाडी – दोडामार्ग – वेंगुर्ला विधानसभा मतदार संघ आढावा बैठक. सायं. 7.30 वा. मोटारीने सावंतवाडी येथून कुडाळकडे प्रयाण. रात्री 8.00 वा. कुडाळ येथे आगमन. रात्री 8.50 वा. मत्स्यगंधा एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.