वेंगुर्ला
भारतीय जनता पार्टीतर्फे दिपावली सणाचे औचित्य साधून यावर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ४ नोव्हेंव्हर २०२१ रोजी वेंगुर्ले रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात सायंकाळी ठिक ५ वाजता इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत वेंगुर्ले शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी केले आहे.
स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांक २००० रू. व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक- रोख रुपये १५०० व प्रशस्तीपत्र,तृतीय क्रमांक- रोख रुपये १००० व प्रशस्तीपत्र आणि उत्तेजनार्थ प्रथम रोख रुपये ५०० व प्रशस्तीपत्र उत्तेजनार्थ द्वितीय रोख रुपये ५०० व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
ही स्पर्धा वेंगुर्ले शहरासह तालुक्यातील सर्व वयोगटातील इच्छूक स्पर्धकांसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारण्यात आलेले नाही. एका स्पर्धकाला केवळ एकच इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धेसाठी सादर करता येईल. स्पर्धेसाठी केवळ इकोफ्रेंडली आकाशकंदील स्वीकरण्यात येतील. कल्पकता, नाविन्यता व आकर्षकतेचा स्पर्धेच्या परीक्षणात विचार होईल. आकाशकंदील बनविताना थर्माकोल, प्रदूषणकारी वस्तू, प्लास्टिकचा वापर करण्यात येऊ नये. सायंकाळी ठिक ६ वाजता परीक्षणास प्रारंभ होईल. इच्छूक स्पर्धकांनी आगावू नावनोंदणी व माहितीसाठी ९४२२४३६७७७ या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.