You are currently viewing माणूस म्हणून जगण्याचा आधार मानव अधिकार

माणूस म्हणून जगण्याचा आधार मानव अधिकार

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

लेख: अहमद मुंडे

10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्र संघाने हा वैश्विक जाहीरनामा अखिल मानव जातीच्या प्रति विविध हक्क व अधिकार. यांची जाणीव करून देण्यासाठी समर्पित केला. म्हणून तर 1 डिसेंबर हा दिवस जागतिक मानव अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो. मानव अधिकार कार्यकर्त्यांनी हा दिवस 30 कलमी जाहिरनामा मनापासून माहिती करून घेणे गरजेचे आहे
मानव कुटुंब प्रिय आहे. समूहाने राहणे. आपण जिथे राहतो तिथे आपल्या जीवनासाठी व जगण्यासाठी आवश्यक असणार्या सुख सोयी उपलब्ध करून घेण्यासाठी संविधानात आपणांस काही मूलभूत अधिकार व हक्क कर्तव्य आखून दिली आहेत जया अर्थी मानव कुटुंबातील सर्व व्यक्ती चे स्वाभाविक प्रतिष्ठा. व त्यांचे सन्मान न्याय व शांतता यांच्या प्रसथापनेचा पाया आहे ज्या अर्थी मानवी हक्क व अधिकार यांचें हनन अवहेलना व अप्रतिष्ठा झाल्याने अमानुष कृत्य घडून आली त्यामुळे सर्व मानवी जीवन विस्कळीत झाले. आणि त्यायोगे मानव जातीच्या सदविवेक बुध्दी वर मोठा आघात झाला त्यातून. गुंडगिरी. दहशतवाद नक्षलवाद व्यसन. असया समाजासाठी विघातक असणार्या प्रवृत्तीने डोकं वर काढलं. आणि त्यातून मानवाच्या भाषण स्वातंत्र्याचा व उपभोगता घेता व यातळी गरज यापासून त्याची मुक्तता होईल अशा जगाची उभारणी करणे ही सर्वोच्च आकांक्षा म्हणून घोषित करण्यात आली आहे यांच्यावर उपाय म्हणून जुलुम दडपशाही यांच्याविरुद्ध अखेरचा उपाय म्हणून आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून घेण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने व मानवाला बंड करणे. आंदोलन करणे. उपोषण करणे. व अन्य मार्गाने आपल्या वर झालेल्या अन्यायाची दाद मागणयाची वेळ येवू नये म्हणून मानवी अधिकारांचे संरक्षण कायद्याने करणे गरजेचे आहे म्हणून मानव अधिकार ही संकल्पना अमलात आणली
राष्ट्र राष्ट्रा मध्ये मित्रत्व संबंध वृद्धिंगत करण्याच्या कार्यासाठी चालना देणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्रा चया सनदेमधये मूलभूत हक्क अधिकार मानवी अधिकार प्रतिष्ठा व महत्व महिला व पुरुष समानता समान अधिकार यावरील आपली श्रद्धा निश्चिय पूर्ण पुन्हा व्यक्त केली आहे आणि अधिक अधिक स्वातंत्र्याचे वातावरण समाजप्रगती. घडवून आणण्याच्या व जीवनभर सुधारण्याचा निर्धार केला आहे. संयुक्त राष्ट्रानी सदस्य राष्ट्रसंघटनेचा सहकार्याने व कर्मचारी पदाधिकारी मानवी हक्क व अधिकार मूलभूत अधिकार स्वातंत्र्य जागतिक प्रतिष्ठा. प्राप्त करून देणायाचे व त्याबद्दल जनजागृती जाहिरात संबोधन प्रबोधन व त्यांचे पालन करण्याचे ध्येय साध्य करण्याची मानव अधिकार कार्यकर्त्यांनी शपथ घेतली आहे. हा मानवीय अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा सर्व लोकांसाठी ध्येय सिध्दी एक समान आदर्श म्हणून उद्घोषणा करते व त्यासाठी प्रत्येक व्यक्तिने व समाजातील प्रत्येक घटकाने हा मानव अधिकार जाहीरनामा सतत डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. अध्यापन व शिक्षण यांच्या द्वारे या अधिकारांचा व स्वातंत्र्याचा मान राखला जाण्यासाठी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा प्रगतिक स्वरूपाचा उपाय योजनांच्या द्वारे सदस्य राष्ट्रांच्या लोकांमध्ये व त्यांच्या क्षेत्राधिकार प्रदेशातील लोकांमध्ये त्यांना जागतिक मान्यता मिळवून व त्यांचे परिणामकारक पालन केले जाण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत
# तक्रार कोठे आणि कशी करावी #
भारतीय राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत त्यांचा वापर उपभोग घेण्यासाठी विविध तरतूद करण्यात आली आहे प्रशासन शासकीय निमशासकीय कार्यालयाकडून. प्रशासनाकडून एखाद्या व्यक्तिच्या मूलभूत हक्क व अधिकार यांची पायमल्ली होत असेल. अशा सर्वसामान्य माणसाला गोरगरीब जनतेच्या मदतीला मानव अधिकार आयोग धावून जातो. आयोगाचा कार्यकाल पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे आणि हे मानव अधिकार कार्यकर्त्यांचे परम कर्तव्य आहे. मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ हा २८ सप्टेंबर १९९३ रोजी लागू करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग नोव्हेंबर २००१ रोजी स्थापन करण्यात आला.
#*#* ‌‌. (१) अशी कोणतीही व्यक्ती की ज्याच्या मानवी हक्कांचे उल्लंघन किंवा हनन झाले असेल त्या व्यक्तिस किंवा त्या व्यक्तिच्या वतीने कोणताही व्यक्ती स्वता किंवा पोस्टाने. फॅक्स. वर मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करू शकतात
(२) कोणत्याही स्वरूपाचे शुल्क अथवा तिकीट लागत नाही
(३) सदर तक्रार संबंधित अध्यक्ष किंवा मानवी हक्क आयोग यांना संबोधित करून करावी
(४) कोणत्याही शासकीय निमशासकीय अधिकार्यांचे विरोधात तक्रार दाखल करता येते
(५) तक्रार मराठी. हिंदी गुजराती. भाषेतून करता येते
(६) सरकार किंवा सरकारी अधिकारी व कर्मचारी यांचेकडून होत असलेला शारीरिक अत्याचार. मानवी हक्क विषयक. फसवणूक व कोणत्याही प्रकारचा छळ. तसेच सन्मानाने जगण्याच्या प्रयत्नात सरकारी अधिकारी व कर्मचारी यांनी केलेला अमानविय हस्तक्षेप आदी करण्यासाठी तक्रार करता येते
(७) पोलिस स्टेशनमध्ये आरोपीला झालेली अमानविय माराहान त्याबद्दल तक्रार दाखल करता येते
(८) पोलिस कोठडी. कारागृह. बालसुधारगृह. येथे झालेला अमानवीय छळ. आणि मृत्यू. हरवलेली बालके व व्यक्ती यांचा शोध घेण्यास टाळाटाळ अशावेळी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करता येते
(९) अन्न. वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण. आदि मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी अपेक्षित समाजाची शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून होणारी हेळसांड या विरोधात मानव अधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करता येते
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा मानव अधिकार
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा