बाबुराव धुरी यांची शिष्टाइ तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे पत्र
प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम ३० डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे ठेकेदाराला आदेश
दोडामार्ग
शासन व ठेकेदाराची चालढकल होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस यांनी उपोषणास्त्र उपसले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार इमारतीचे बांधकाम पूर्ण होत नसल्याने रुग्णांना बाजूच्या इमारतीत व रुग्णालय आवारात उपचार घ्यावे लागत आहेत. त्यासाठी शासनाने या प्राथमिक रुग्णालयाच्या इमारतीचे काम लवकर पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण व्हावे अशी त्यांची मागणी होती. त्यांनी आपले उपोषण दुसऱ्या दिवशी मंगळवारी शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या मध्यस्थीने व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या पत्राने सदर उपोषण मागे घेण्यात आले.
या पत्रानुसार सदर ठेकेदाराने ३० डिसेंबर पूर्वी इमारत बांधकाम पूर्ण करावे व रुग्णांची हेळसांड होण्यापासून वाचवावे असे म्हटले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन प्रविण गवस यांनी उपोषण मागे घेतले.