You are currently viewing तळेरेतील प्रसिद्ध व्यापारी प्रकाश जमदाडे यांचे निधन..

तळेरेतील प्रसिद्ध व्यापारी प्रकाश जमदाडे यांचे निधन..

तळेरे

तळेरे एस.टी.बस स्थानकासमोरील प्रसिध्द व प्रतिष्ठीत हार्डवेअर तसेच बिल्डिंग मटेरियल व्यावसायिक प्रकाश जमदाडे यांचे नुकतेच अल्पश: आजाराने अकाली दु:खद निधन झाले.

प्रकाश जमदाडे म्हणजे तळेरे बस स्टँड समोरील दुकानात बसून ग्राहकांचे हसतमुख स्वागत करणारा एक सच्चा, सचोटीने व्यापार करणारा शांत , संयमी, सेवाभावी असं व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात असे.संगीत ऐकण्याची प्रचंड आवड होती.
गावातील सगळ्या उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा.परंतु काळाने त्यांच्यावर घाला घातला.प्रकृतीने अत्यंत सुद्रुड असून सुद्धा अचानक त्यांच्या मेंदूतील रक्तस्रावाने उपचारा दरम्यान दुर्दैवी निधन झाले. प्रकाश जमदाडे यांचे अचानक जाण्याचे वृत्त हे सर्वांच्या मनाला चटका लावून गेले.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, मुलगी, भाऊ, सुन,
नातवंडे असा परिवार आहे.
तळेरे बाजारपेठ बंद ठेऊन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.त्यांच्यावरती तळेरे येथील स्मशानात भूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.
फोटो:- प्रकाश जमदाडे

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =