You are currently viewing कामगार नेते आप्पा पराडकर पुरस्कृत रुग्णवाहिकेचा 29 रोजी लोकार्पण सोहळा

कामगार नेते आप्पा पराडकर पुरस्कृत रुग्णवाहिकेचा 29 रोजी लोकार्पण सोहळा

कणकवली
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कामगार नेते आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा सहसंपर्कप्रमुख निलेश ( आप्पा ) पराडकर पुरस्कृत सर्व सोयीनींयुक्त रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा . शिवसेना नेते सचिव खासदार विनायक राऊत , परिवहनमंत्री अॅड . अनिल परब तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री , ना . उदय सामंत यांच्या हस्ते शुक्रवार २ ९ ऑक्टोबर २०२१ रोजी ठिक सकाळी १० वाजता रत्नागिरी विश्रामगृह येथे होणार आहे


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी मंत्री , आम. दिपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख , आम. वैभव नाईक, शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय पडते ,युवानेते संदेश पारकर जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, उद्योजक किरणशेठ सामंत ,अतुल रावराणे , महिला आघाडीप्रमुख जान्हवी सावंत , नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे . तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिवसेना उपजिल्हाप्रमुख , तालुकाप्रमुख , युवासेना , महिला पदाधिकारी आणि हिंद भारतीय जनरल कामगार सेना पदाधिकारी यांनी उपस्थित राहू कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन . निमंत्रक शिवसेना सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख तथा हिंद भारतीय जनरल कामगार सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजू शेट्ये ,व युवासेना समन्वयक,हिंद भारतीय जनरल कामगार सेना , सिंधुदुर्ग चिटणीस राजू राठोड यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा