तहसीलदार, प्रांताधिकारी आणि मुख्याधिकार्यांना निवेदन…
सावंतवाडी
वैश्यवाडा हनुमान मंदिर ते उभाबाजार येथील रस्त्या खालून संस्थान कालावधीतील मुख्य नळ पाईप लाईन गेली आहे. तर दुतर्फा घरे असून रस्ता खोदकाम करताना ती लाईन फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास हे खोदकाम थांबविण्यात यावे, अशी मागणी वैश्यवाडा येथील रहिवाश्यांनी तहसीलदार, प्रांताधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर गोकुळदास शिरसाट, श्रीकृष्ण पिळणकर, दयानंद शिरसाट, दिगंबर शिरसाट, नरेश जिरंगे लता कासार दिनेश मडगावकर संकेत शिरसाट सलमान बिजली आदींच्या सह्या आहेत.
निवेदनात असे म्हटले आहे कि, वैश्यवाडा हनुमान मंदिर ते उभाबाजार या रस्त्या खालून संस्थान पाण्याची लाईन गेली आहे.या पाईप लाईन मधून रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या घराना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. ही पाईप लाईन आणि कनेक्शन जुनी असल्याने खोदकाम करताना फुटण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ऐन दिवाळीत तेथील लोकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तूर्तास हे खोदकाम थांबवून दिवाळीनंतर रस्ता खोदाईचे काम करावे तसेच मुख्य पाईपलाईन व ग्राहक नळ कनेक्शन सुरक्षित ठेवून पाणीपुरवठा वेळीच करून देण्याची जबाबदारी नगरपालिकेने पार पडण्याची हमी ग्रामस्थांना देणे आवश्यक आहे. तसेच हे काम करताना या पाईप लाईनला कोणताही धोका होणार नाही आणि पाणी वेळेतच सोडण्यात येईल अशी हमी नागरिकांना नगरपालिकेने द्यावी,असे त्यात म्हटले आहे.