निवती-मेढा येथील तुकाराम शामसुंदर मेथर यांच्या घरात सिलेंडरचा स्फोट होऊन अपघात झाला होता. यामध्ये त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य नीलेश सामंत यांनी त्यांच्या घराची पाहणी करून त्यांना धीर देत तात्पुरत्या स्वरूपात १० हजार रुपयाची आर्थिक मदत केली.
सिलिंडर गॅसचा स्फोट होऊन यामधे स्वयंपाक घराचे व अन्य साहित्य मिळून सुमारे ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र स्फोट झाल्याचे लक्षात येताच घरातील व्यक्ती वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. दरम्यान श्री सामंत यांनी त्यांना भेटून धीर दिला. यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रसाद पाटकर उपस्थित होते.