You are currently viewing मठ बुद्रुक सोसायटी निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय

मठ बुद्रुक सोसायटी निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय

मालवण

मठबुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. मठ बुद्रुक सोसायटीच्या १३ जागासाठी झालेल्या निवडणुकीत उपसभापती राजू परुळेकर व माजी शिक्षण सभापती अनंत राऊत यांच्या नेतृत्वाखालील भाजप पुरस्कृत पॅनेलच्या १२ सदस्यांनी विजय संपादन केला आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे वारे वाहत असताना सहकार स्तरावरील मालवण तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या या निवडणुकीत भाजपची सरशी झाली मालवणचे उपसभापती राजू परुळेकर यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. सोसायटी निवडणुकीतील विजय हा ग्रामस्थांनी उपसभापती राजू परुळेकर यांना दिवाळी पूर्वीच दिलेली दिवाळी भेट ठरल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.

या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे सर्वसाधारण गट : विठोबा गुणाजी बागवे, भानुदास चंद्रकांत गायकवाड, बाबुराव विनायक जंगले, अशोक शशिकांत कांदळकर, गुरुदेव शिवराम केळुसकर, उमाजी बाबाजी मालप, भानुदास आत्माराम येरम, महिला प्रतिनिधी : सुनीता शशिकांत बागवे, सावित्री शशिकांत कांदळकर, अनुसुचित जाती : महादेव विष्णू पाताडे, भटक्या विमुक्त जमाती : सोनू विजू जंगले, इतर मागास प्रतिनिधी : सुभाष परशुराम मांजरेकर हे उमेदवार विजयी झाले आहेत या सर्व विजयी उमेदवारांचे भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत उपसभापती राजू परुळेकर यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. सोसायटी निवडणुकीतील विजय हा ग्रामस्थांनी उपसभापती राजू परुळेकर यांना दिवाळी पूर्वीच दिलेली दिवाळी भेट ठरली आहे.

विजयावर प्रतिक्रिया देताना मालवणचे उपसभापती राजू परुळेकर यांनी आनंद व्यक्त करतानाच हा विजय येथील शेतकऱ्यांचा आहे. मी विजयाचे श्रेय मठ बुद्रुक, निरोम व बुधवळे गावातील ग्रामस्थ व सोसायटी सभासदांना दिले आहे. माजी शिक्षण सभापती अनंत राऊत, जनार्दन सावंत, प्रशांत परब, जिब्बा पाटील, मंगेश राऊत, भाई घाडी, निलेश बाईत, गुरू घाडी, सरपंच उमेश मांजरेकर, रवी घाडी, बाळा वेंगुर्लेकर, प्रकाश मुणगेकर, बाळा राऊत, अमित मेस्त्री, अनिल गावडे, उत्तम मल्हार, जानू जंगले, गुरू शिर्वेकर, बंडू बिर्जे, बाबू बाईत, जिजी केळुसकर, राजू मुणगेकर, सिद्धेश परुळेकर, बापट,कदम व अन्य ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सोसायटीतील विजय शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा