वेंगुर्ले
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग , ग्रामपंचायत तुळस आणि आर. सी. सी. देऊळवाडा,तुळस आयोजित सलग १८ व्या रक्तदान शिबिरास दात्याचा उत्तम प्रतिसाद लाभला.
श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस(तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्था मुंबई, बाहुउद्देशीय सभागृह) येथे रक्तपेढी सिंधुदुर्गच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन सरपंच शंकर घारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, ग्रा.प सदस्य जयवंत तुळसकर, सोनू आरमारकर, श्रद्धा गोरे , प्रतिष्ठान चे सचिव प्रा.सचिन परुळकर, उपाध्यक्ष नाना राऊळ व प्रदीप परुळकर,मंगेश सावंत,सद्गुरू सावंत, अविनाश तुळसकर, अजय नाईक, मिलिंद शेटकर,संजय परब, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग उपाध्यक्ष महेश राऊळ, आर.सी.सी. देऊळवाडा चे प्रतिनिधी गौरेश तुळसकर, सुजाता पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
वेताळ प्रतिष्ठानने कोरोना कालावधीत जनजागृती करिता सातत्याने उपक्रम राबविले त्याच बरोबर काळाची गरज जाणून रक्तदान शिबिराचे कोरोना काळात चार वेळा आयोजन करून प्रतिष्ठानने आदर्शवत काम केले त्याबद्दल कौतुक सरपंच शंकर घारे यांनी केले. तर प्रतिष्ठानचे सचिव प्रा.सचिन परुळकर यांनी रक्तदान सारख्या उपक्रमात सामाजिक संस्था- मंडळे काम करताना दिसून येतात पण तुळस ग्रामपंचायत या उपक्रम आयोजनात गेली चार वर्षे सातत्याने प्रतिष्ठानला सहकार्य करत आहे. रक्तदान शिबीर आयोजन करणाऱ्या जिल्ह्यातील मोजक्या ग्रामपंचायत असून आपली तुळस ग्रामपंचायात त्यापैकी एक असल्याचे सांगून इतर स्थानिक स्वराज संस्थानी यापासून प्रेरणा घेऊन अशी रक्तदान शिबीरे आयोजित करावी अशी अपेक्षा व्यक्त करत तुळस ग्रामपंचायत व रक्तदात्यांचे चे आभार व्यक्त केले.
यावेळी सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य एकनाथ चव्हाण, सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे,सनी रेडकर यांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान, आर. सी सी देऊळवाडा चे कार्यकर्ते व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन गुरुदास तिरोडकर व आभार माधव तुळसकर यांनी मानले.