सावंतवाडी तालुक्यात अनेक नेते आपापली जादू दाखवत राजकारणात यशस्वी झाले. कित्येकांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली. काहींचं नेतृत्व तर काहींचं कर्तृत्व जनमानसांत आपली छाप पाडून जाते. परंतु आपल्या कल्पक नेतृत्वगुण आणि कर्तृत्वाने सावंतवाडी तालुक्यातील एक अत्यंत हुशार, झुंजार राजकारणी म्हणून ओळख निर्माण केली ती महेश सारंग यांनीच.
नारायण राणे यांच्या मुशीतून तयार झालेलं महेश सारंग हे समाजभिमुख नेतृत्व. पंचायत समितीचे उपसभापती म्हणून देखील त्यांनी तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना सावंतवाडी तालुकाप्रमुख म्हणून त्यांनी पक्षासाठी उत्तम कार्य केले. संघटन कौशल्य हा गुण अंगी असल्याचे त्यांनी पक्षासाठी केलेल्या कार्यातून दाखवून दिले. गावागावात, वाडीवाडीत ते स्वतः पोहचत त्यांनी संघटना वाढविली गावागावात युवकांची फळी निर्माण केली. त्याचा फायदा प्रत्येकवेळी पक्षाला झाला.
भंडारी समाजासाठी देखील त्यांनी मोलाचे काम केले आहे. समाजाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते हिरहिरीने भाग घेतात त्यामुळे राजकीय वाटचालीत त्यांना त्याचा फायदाच होतो. काँग्रेस पक्षत्याग करून त्यांनी भाजपाचा झेंडा हाती धरला आणि सावंतवाडी तालुक्यात भाजपा पक्ष वाढीसाठी हरसंभव प्रयत्न केले. राजकारणात विविध पदे भूषवूनही जमिनीवर पाय असलेले महेश सारंग हे अनेकांच्या अडीअडचणीला धावून जातात. कोलगाव येथील जातीय तेढ निर्माण करणारा वाद असो वा पुण्यात डॉक्टरच्या दादागिरीमुळे अडचणीत आलेल्या युवतींचा प्रश्न असो, महेश सारंग यांनी ते प्रश्न स्वतःच्या हिमतीवर लीलया सोडवले होते.
राजकीय पक्षासाठी असो वा सामाजिक प्रश्नांसाठी मनापासून कार्य करणाऱ्या लोकनेता महेश सारंग यांचा आज वाढदिवस…. संवाद मिडियाकडून महेश सारंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💐