झाराप गावची ग्रामदेवता भावई देवीच्या मंदिरात काल
शुक्रवार २२ ऑक्टोबर रोजी रात्रौ ठिक ७ वाजता भावई मित्रमंडळ आयोजित नामवंत संयुक्त कलाकारांच्या संचात महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.या नाटकाला नाट्यरसिकांचा उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला.
या नाट्य प्रयोगात “गरुड गर्वहरण” हा भाग सादर करण्यात आला. या प्रयोगात गणपतीचे पात्र अभिनय तेजस सोमण, बलरामचे पात्र वैभव धुरी, कृष्णाचे पात्र भरत नाईक, नारदाचे पात्र चारुहास मांजरेकर, रुक्मिणीचे पात्र निळकंठ सावंत, सत्यभामाचे पात्र रमेश शिरोडकर, गरुडाचे पात्र बाळा हळदणकर, मारुतीचे पात्र सुधीर हळदणकर, माळीचे पात्र सुहास गावडे यांनी सादर केले.
तर या नाट्य प्रयोगाला संगितसाथ हार्मोनियम अमोल मोचेमाडकर, मृदंगमणी अर्जुन सावंत, तालरक्षक नाथा काळसेकर यांनी दिली.
तसेच हेळेकर दशावतार नाट्य मंडळ,कारिवडे व मालक सुहास गावडे यांचे विशेष सहाय्य लाभले.
या नाटकाला नाट्यरसिकांचा उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला.नाट्यरसिकांनी नाटकातील पात्रांच्या कलेचा गौरव करण्यासाठी बहूमोल बक्षिसे दिली