तहसीलदार रामदास झळके, नायब तहसीलदार अशोक नाईक यांचा मोहिमेत सहभाग…
वैभववाडी
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत येथील तहसील कार्यालय परिसरात स्वच्छता व प्लास्टिक एकत्रीकरण मोहीम राबविण्यात आली. तहसीलदार रामदास झळके यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी यांनी संपूर्ण परिसर स्वच्छ केला.
यावेळी तहसीलदार रामदास झळके, नायब तहसीलदार अशोक नाईक, संजय गांधी विभाग अधिकारी सुनिल बाकडे, पुरवठा अधिकारी सी. जी. भोये, आर. डी. लांडगे, विनोद चव्हाण, तलाठी राजू चरापले, गणेश बडे, केदारी बागल, अक्षय लोणकर, जोश्ना नारकर, मंगल गायकवाड, श्रीमती ए.व्ही. नाईक, एम.व्ही. कोकाटे, अशोक गुरव, डी. एस. माने, एच.डी. शिंदे, संतोष काळे, व्ही.डी.के. फँसिलिटी कंपनी पुणे चे प्रतिनिधी मिरासाहेब सुतार व कर्मचारी उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियान दि. २२ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत तालुक्यात सर्व शासकीय कार्यालय परिसर, सर्व प्राथमिक व माध्यमिक कॉलेज परिसर, ग्रामपंचायत परिसर, बसस्थानक परिसर, पिण्याचे पाणी स्त्रोत परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर या ठिकाणांची साफसफाई करण्यात येणार आहे.