जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना
ही वाट चांदण्यांची मज दूर दूर नेई
अन् आठवांची दाटी,कवेत मज घेई
ते यौवनातले ते,दिन येती पाकळीत
नयनात फक्त राही,दिनरात मनमित …
मी चंद्रिका नभात, तो चंद्र दूर भासे
अन् दाटती मनात,श्वासात ते उसासे
प्रिती पथावरी ते,किती गोड भासतात
वाटे मला ही तेव्हा,घ्यावाच हाती हात …
प्रणयात ते चकोर आसुसती किती ते
जरी धुंद काळरात नाहीच कोणी भीत
लवलेश ना भयाचा मनी नाचे नित्य मोर
टक लावूनी पहाती आभाळी चंद्रकोर …
प्रणयात विश्व सारे,मशगुल होई नित्य
प्रिती मना मनाची शाश्वत आहे सत्य
कुर्बान प्रितीवरी तन मन हे करावे
अवघेच विश्व मग प्रिती वरी तरावे ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)