सदस्यांनी ४ दिवसात शिल्लक कामे सुचवावीत! ; जि.प. अध्यक्षा सौ. संजना सावंत
ओरस
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या आराखड्याला मान्यता घेताना विरोधी सदस्यांनी विरोध केला मात्र सर्व जिल्हा परिषद सदस्यांची सर्व कामे समाविष्ट करून हा अंतिम आराखडा जिल्हा नियोजन समितीला सादर करण्याची ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संजना सावंत यांनी शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिली. व विविध योजनांवर केलेल्या १९० कोटी ७५ लाख ९६ हजार रुपयांच्या आराखड्यास जिल्हा परिषदेच्या खास सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर देण्यात आली.
जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत याच्या अध्यक्षतेखाली संपंन्न झाली. यावेळी जि.प. मुख्यकार्यकारी प्रजित नायर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कापडणीस सभापती डाॅ अनिषा दळवी, अंकुष जाधव, महेद्र चव्हाण, शर्वाणी गावकर आदी पदाधिकारी तसेच गटनेते रणजित देसाई, विरोधी गटनेते नागेंद्र परब, संतोष साटवीलकर, संजय पडते, प्रदिप नारकर, दादा कुबल, अमरसेन सावंत, रविंद्र उर्फ बाळा जठार, मनोज रावराणे रवी पाळेकर, रोहिणी गावडे, प्रितेष राऊळ, संजय नकाशे, संजय देसाई, रेश्मा सावंत आदी सदस्यांनीही विविध चर्चेत सहभाग घेतला.
जिल्हा परिषदेच्या विशेष सर्व साधारण सभेत शुक्रवारी मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या आराखड्यास आपली कामे नसल्याचे सांगत शिवसेनेच्या सदस्यांनी विरोध केला. यामुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संजना सावंत यांनी या आराखड्यात आपण दिलेली कामे नसतील तर ती पुन्हा द्या आराखड्यात समावेश करण्यात येईल असे स्पष्ट केले.यामुळे अखेर. विविध योजनांवर केलेल्या १९० कोटी ७५ लाख ९६ हजार रुपयांच्या आराखड्यास या सभेत सर्वानुमते मंजूर देण्यात आली.