You are currently viewing गांधी विचार परिचय परीक्षेत मोक्षदा, चैतन्य, पियुष प्रथम

गांधी विचार परिचय परीक्षेत मोक्षदा, चैतन्य, पियुष प्रथम

मालवण

विद्यार्थांमध्ये नैतिक मूल्यांचा विकास आणि हिंसामुक्त समाज घडविण्यासाठी मुंबई सर्वोदय मंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘गांधी विचार परिचय परिक्षेत श्री. दाजीसाहेब प्रभूगावकर जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा मसुरे नं. १ शाळेतील एकूण ४२ विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. ‘गांधी बापू’ आणि ‘माझी जीवनगाथा’ या पुस्तकांचे वाचन करुन त्यावर आधारीत वस्तुनिष्ठ प्रश्नांची लेखी परीक्षा असे या उपक्रमाचे स्वरुप होते.
युवा पिढीमध्ये प्रेम, बंधुत्व, मैत्रीभाव, सहिष्णुता, सेवाभाव, सत्य, अहिंसा आणि निर्भयतेचे बीज रुजवून त्यांना संघर्ष निवारणाकडे प्रवृत्त करण्यासाठी गांधीजींचे विचार पोहोचविणे असे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

या परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे-इयत्ता 5वी ते 7वी या गटातून
प्रथम क्रमांक- मोक्षदा दीपक कातवणकर व चैतन्य भगवान भोगले,
द्वितीय क्रमांक- यशश्री गुरुनाथ ताम्हणकर
तृतीय क्रमांक – यशस्वी सचिन कातवणकर
उत्तेजनार्थ – मानसी दीपक पेडणेकर

इयत्ता 8 वी ते 10 वी या गटातून
प्रथम क्रमांक- पियुष संजय भोगले, द्वितीय क्रमांक- वैष्णवी दत्ताराम सावंत , तृतीय क्रमांक – वानिष प्रशांत शिरसाट, उत्तेजनांर्थ – चेतन अनिल दुखंडे.

गुणवंत विद्यार्थांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थांना सर्वोदय मंडळ मुंबई यांच्याकडून प्रमाणपत्र देण्यात आले. यशस्वी विद्यार्थांचे मुख्याध्यापिका सौ. शर्वरी सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सन्मेष मसुरेकर आणि सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा